टीईटी परीक्षेबाबत पाचशे जणांचे आक्षेप, राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांची माहिती
पुणे, दि. 05, ऑगस्ट - शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच पार पडली असून राज्य परीक्षा परिषदेकडून अंतरिम उत्तरसूचीही जाहीर करण्यात आली होती. या उत्तरसूचीवर अठवडाभरात जवळपास चारशे ते पाचशे आक्षेप व तक्रारी जणांच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली.
राज्यभरात 22 जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. मात्र यावेळी पेपरमध्ये अनेक व्याकरणाच्या चुका असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक प्रश्नांचे अर्थच लागत नसल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे होते. त्यावर राज्य परिषदेने अंतरिम उत्तरसूची जाहीर केली असून त्यावर 27 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान आक्षेप नोंदविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार परिषदेकडे जवळपास चारशे ते पाचशे तक्रारी आल्या असल्याचे डेरे यांनी सांगितले.
डेरे म्हणाले, तक्रारी करणार्यांची संख्या जरी जास्त असली तरीही त्यामध्ये त्याच त्याच प्रश्नाबबातचे आक्षेपांची संख्या अधिक असते. त्यामुळे सोमवार, मंगळवार बुधवार हे पुढील तीन दिवस या आक्षेपांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच या तीन दिवशी प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञ व्यक्तींनाही बोलावण्यात आले आहे. यामध्ये कोणते आक्षेप खरोखरच योग्य आहेत व त्यानुसा प्रश्न रद्द होऊ शकतात याची पहाणी केली जाईल व त्यानंतर साधारण आठवडाभरात अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल असे डेरे यांनी सांगितले.