बंगळुरुमध्ये ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु, पाच रुपयांत नाश्ता तर 10 रुपयांमध्ये जेवण
बंगळुरु, दि. 16, ऑगस्ट - कामगार वर्ग आणि गरिबांना परवडणा-या दरात जेवण मिळावे यासाठी बंगळुरूमध्ये ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरू करण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते या कॅन्टीनचे उद्धाटन करण्यात आले. इंदिरा कॅन्टीनमध्ये केवळ पाच रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे. बंगळुरूमध्ये कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहु नये यासाठी हे कॅन्टीन सुरु करण्यात आले आहे. याप्रमाणेच राज्यातील अन्य शहरांमध्ये देखील असेच कॅन्टीन लवकरच सुरु होतील, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.
बंगळुरूमध्ये गरिबांना परवडणा-या दरात जेवण मिळण्यासाठी बुधवारपासून इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. या कॅन्टीनमध्ये कामगार वर्ग आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळणार असल्याचे सिद्धरमैय्या यांनी काल (15 ऑगस्ट) सांगितले होते. पहिल्या टप्प्यात 101 कॅन्टीन सुरू होणार असून यामध्ये 5 रुपयांत शाकाहारी नाश्ता आणि दहा रुपयांमध्ये दुपारचे जेवण आणि याच दरात रात्रीचे जेवणही दिले जाणार आहे.