Breaking News

एच-1बी व्हिसासाठी 2.47 लाख भारतीयांचे अर्ज दाखल

नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - एच-1बी व्हिसासाठी 2.47 लाख भारतीयांनी अर्ज दाखल केले आहेत . अमेरिकेच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ  महिन्यांमध्ये 2.47 लाख भारतीयांनी अर्ज दाखल केले आहेत. 1 ऑक्टोबर 2016 ते 30 जून 2017 दरम्यान ज्या नागरिकांनी व्हिसासाठी अर्ज केला  त्यात 74 टक्के भारतीयांचा समावेश आहे. 2015-16 मध्ये तीन लाख भारतीयांनी एच-1 बी व्हिसासाठी अर्ज केला होता. 30 जूनपर्यंत 36,362 चीनी  नागरिकांनी एच-1 बी व्हिसासाठी अर्ज केला होता. गेल्या 10 वर्षामध्ये प्रथमच चीनी नागरिकांचे एवढे कमी अर्ज दाखल झाले आहेत.
एच-1बी व्हिसासाठी अर्ज करणा-यांमध्ये कॅनडाचा तिसरा क्रमांक लागतो. 30 जून 2017 पर्यंत 3,551 कॅनडीयन नागरिकांनी अर्ज केला होता.  अमेरिकेत 30 जूनपर्यंत एच-1बी व्हिसासाठी 3.36 लाख अर्ज आले असून यापैकी 1.97 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.