निवृत्तीच्या दिवशीच पीएफ मिळणार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - केंद्र सरकारनं नोकरदार वर्गासाठी एका आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना पीएफ मिळणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटने (ईपीएफओ) सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासाला संसदेत यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली.
तुम्ही नोकरी करत असल्यास कंपनी तुमच्या पगारातील काही रक्कम ईपीएफ खात्यामध्ये टाकते. हे पैसे केंद्र सरकार स्वतःच्या फंडात जमा करतं आणि आवश्यकता असते त्यावेळी व्याजासकट परत मिळतात. मात्र, आता ही रक्कम निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आहे. तसेच 1995च्या सदस्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच आणि पेन्शनचाही भरणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.