Breaking News

बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त

बीड, दि. 21, जुलै - अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांची खास बडदास्त ठेवल्याचं दिसून  येत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडमध्ये रमेश कदमांना आणण्यात आलं. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये न ठेवता त्यांची सोय शासकीय  विश्रामगृहात करण्यात आली होती. विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहात आमदार रमेश कदम यांच्या नावावर रुमही बुक करुन नंतर खाडाखोड केल्याचं समोर आलं  आहे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी रमेश कदम यांना बीडमधील जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना दोन  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, पोलिसांनी त्यांना लॉकअपमध्ये न ठेवता थेट शासकीय विश्रामगृहात ठेवलं. विशेष म्हणजे बीड शहरातमध्ये एक कारागृह,  तीन मोठे पोलीस स्टेशन आहेत तरीही रमेश कदम यांची शाही व्यवस्था विश्रामगृहात का केली, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम हे आरोपी आहेत. कोणतीही  प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरतीउस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलंनियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं.  त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्यालाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले.