Breaking News

वनश्री जनाबापू मेहेत्रे यांना अण्णा हजारे यांच्या हस्ते शिक्षकरत्न पुरस्कार

बुलडाणा, दि. 21 - देऊळगावराजा शिक्षण संस्था देऊळगावराजाद्वारा संचालित दे.राजा हायस्कुल येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले वनश्री जनाबापू  मेहेत्रे यांना अण्णा हजारे यांच्याहस्ते शिक्षकरस्त पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. 
राळेगण सिध्दी येथे 16 जुलै रोजी फिरोदिया सभागृहात मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय गुणीजन परिषदेचे आयोजन करण्यात आले  होते. या परिषदेत राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या 20 गुणिजनांना पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. जनाबापू मेहेत्रे यांचा शैक्षणिक, सामाजिक,  कृषी, आरोग्य तथा पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षकरत्न पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे  संस्थापक अध्यक्ष अँड. कृष्णाजी जगदाळे, स्वागताध्यक्ष प्रकाश सावंत, कार्यवाह के.एल. गोगावले, एम.जी. घार्गे, हभप शामसुंदर सोन्नर तथा आदि मान्यवर व  गुणिजन उपस्थित होते.