क्रीडा स्पर्धा व वन मिलियन फुटबॉल कार्यक्रमावर क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार कायम
अहमदनगर, दि. 25 - दि. 18 जुलै रोजी मंत्रालयात शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे व शरीरिक शिक्षण, कला समन्वय समितीची तासिका पूर्ववत करण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत कमी केलेल्या दोन तासिके पैकी एक तासिका वाढविण्याबाबत अधिवेशाना नंतर विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनाला बळी पडून काही संघटनांनी बहिष्कार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण शासनाच्या तोंडी आश्वासनावर शिक्षकांचा विश्वास नसल्याने हे आंदोलन चालू ठेवून, शालेय स्पर्धेवर असलेला बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात विद्यार्थी, पालक यांना सामावून आंदोलनातची तीव्रता वाढविणार असल्याची माहिती महा. राज्य. क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, कोषाध्यक्ष घनशाम सानप, व शारीरिक शिक्षण,कला व संगीत विषय बचाव कृती समितीचे सचिव शिवदत्त्त ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. शालेय स्पर्धेवर बहिष्कार कायम ठेवण्यासंदर्भात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन राहुरी येथे करण्यात आले होते. यावेळी महा.शा.शि.महामंडळाचे अध्यक्ष व शारीरिक शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष डॉ.अरुण खोडस्कर यांनी बैठकीदरम्यान फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला. तसेच कला शिक्षकाच्या वतीने विनोद इंगोले तर क्रीडा शिक्षकांच्या वतीने राजेश कदम, सुनील गागरे, शिरीष टेकाडे, राजेंद्र कोतकर, शिवदत्त ढवळे, अप्पासाहेब शिंदे यांनी बाजू मांडून बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन पुढील विषय मजूर करण्यात आले. शासनाचे परिपत्रक किंवा लेखी मिळत नाही तो पर्यंत शालेय स्पर्धेवर बहिष्कार कायम राहणार.
