भंडारदरा धरण 82 टक्के,निळवंडे 50 व मुळा धरण 52 टक्के भरले
अहमदनगर, दि. 24, जुलै - अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा,निळवंडे व मुळा या तीन प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवसांपासून तुफानी पर्यन्यवष्टी सुरू आहे.त्यामुळे अकोले तालुक्यातील जीवन काही प्रमाणात विस्कळित झाले असले तरी जिल्ह्याची जीवनदायिनी मानल्या जाणार्या या धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे.रविवारी सकाळपर्यंत भंडारदरा धरणात 82 टक्के,निळवंडे धरणात 50 टक्के व मुळा धरणात देखील 52टक्के इतका पाणी साठा झाला आहे.पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या काही दिवसांतच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या भंडारदरा धरणाची क्षमता 11.39 टीएमसी इतकी आहे.रविवारी सकाळपर्यंत भंडारदरा धरणातील पाणी साठा 82 टक्क्यांवर पोहोचला आहे.त्यामुळे भंडारदरा धरणातून तातडीने निळवंडे धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.निळवंडे धरणातील पाणी साठा 50 टक्के इतका झाला आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता 26 टीएमसी इतकी आहे.गेले काही दिवस मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.रविवारी सकाळी कोतूळजवळ मुळा नदीच्या पात्रातून 11 हजार क्युसेक्स ने पाणी वाहात होते.नदी पात्रातून येणारे हे सर्व पाणी मुळा धरणात जमा होत आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.शुक्रवारी सायंकाळी मुळा धरणातील पाणी साठा 47 टक्के इतका होता.शुक्रवारी रात्री व शनिवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवारी सकाळी मुळा धरणतील पाणी साठा देखील रविवार सकाळपर्यंत 52 टक्के इतका झाला आहे.सध्या अकोले तालुक्यातील रतनवाडी,पांजरे,घाटघर मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.भंडारदरा धरणाच्या तुलनेत मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे.