Breaking News

कर्नाटकमधील बेल्लारी येथे भाजप नेत्याची हत्या

नवी दिल्ली, दि. 24 - कर्नाटकमधील बेल्लारी येथे भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली. बंदी रमेश असे या नेत्याचे नाव होते. धारदार शस्त्रांनी हल्लेखोरांनी रमेश यांच्यावर हल्ला केला गेला. रमेश हे भाजपच्या जिल्हा अनुसूचित आघाडीचे उपाध्यक्ष होते. पूर्ववैमन्यसामधून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. रमेश यांच्यावर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते . 14 मार्च रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी बंगळुरूमध्ये भाजप नेते किठगनहल्ली वासू यांची हत्या केली होती. तसेच गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.