Breaking News

काँग्रेसच्या 15 नेत्यांसह 42 जणांच्या सुरक्षेत कपात करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. 24 - केंद्रीय गृह मंत्रालयाने 42 नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 15 काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. अजय माकन, अर्जुन मोढवाडिया, शशी थरूर आणि श्रीप्रकाश जयस्वाल , गिरिजा व्यास, प्रिया रंजन दास मुंशी आणि आर.पी.एन. सिंग आदी काँग्रेस नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे . दरम्यान माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांना आता वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात पुरविली गेली आहे. राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांनाही आता वाय दर्जाची सुरक्षा पुरवली गेली आहे.  कोणत्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवण्यात यावी हा निर्णय गृह सचिव, महासंचालक आणि मुख्य सचिवांच्या समितीद्वारे घेतला जातो.