Breaking News

कैलास मानसरोवर यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना

नवी दिल्ली, दि. 12 - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कैलास मानसरोवर यात्रेसाठी पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही तुकडी दिवल्लीहून रवाना झाली आहे. यावेळी त्यांनी यात्रेकरूंना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन केले आहे.तसेच यात्रेचा मार्ग स्वच्छ ठेवा त्यामुळे अधिक पुण्य मिळेल. भगवान शंरकाच्या मनात असेल त्यांनाच या यात्रेला जाण्याचे पुण्य लाभते, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या तुकडीत 58 यात्रेकरुंचा समावेश आहे. या यात्रेकरिता 4 हजार 500 जणांनी अर्ज दिला होता. यामधून 60 जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर लॉटरी पद्धतीने यात्रेकरुंची निवड करण्यात आली. यातील दोन यात्रेकरु शारिरीकरित्या उत्तम नसल्याने त्यांचे जाणे रद्द करण्यात आले. त्यामुळे 58 जणांची पहिली तुकडी आज पाठवण्यात आली.