Breaking News

बीएसएनएल ग्रामीण भागांत 25 हजार वाय-फाट हॉटस्पॉट उभारणार

नवी दिल्ली, दि. 12 - भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्रामीण भागातील दूरसंचार केंद्रात 25 हजार वाय-फाय हॉटस्पॉट उभारण्यासंदर्भात युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड’सोबत एका करारावर स्वाक्षरी केली.
पुढील सहा महिन्यांत हे हॉटस्पॉट लावले जातील. यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड च्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाईल. यासाठी सरकार भांडवली खर्च व व्यवस्थापनाचा खर्च करणार आहे. या योजनेसाठी 840 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
गेल्या वर्षी बीएसएनएलच्या बाजारातील हिश्श्यात 0.30 टक्के वाढ होऊन तो 9.05 वरून 9.35 टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यवस्थापनाच्या खर्चात फायदा अधिक होणार आहे. सरकार ग्रामीण भाग व दूरच्या ठिकाणी इंटरनेट जोडणी उपलब्ध करून देणार आहे, असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले.