Breaking News

केरळमध्ये मच्छीमारांच्या बोटीला अपघात, दोन मच्छिमारांचा मृत्यू

कोची, दि. 12 -केरळमधील कोचीजवळ मालवाहू जहाजाने मच्छीमारांच्या बोटीला धडक दिल्याची घटना घडली असून त्यात आहे. तर एक मच्छिमार बेपत्ता झाला आहे. हे मालवाहू जहाज पनामा या देशातील असून ते कुठे जात होते याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. या बोटीत एकूण 14 जण होते त्यातील 11 जणांना स्वत:ची सुटका करण्यात यश आले.
कोचीतील किनारपट्टीजवळ अंबेर या मालवाहू जहाजाने मच्छिमारांच्या बोटीला धडक दिली. या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही बचाव कार्यासाठी एक पथक पाठवले आहे. बंदरांपासून हे जहाज जवळजवळ आठ सागरी मैल दूर आहे, असे कोचीचे पोलीस आयुक्त एम.बी. दिनेश यांनी सांगितले. दोन मच्छिमारांची मृतदेह ताब्यात घेतले असून शोध कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.