भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी संगकाराचा श्रीलंकेला कानमंत्र
लंडन, दि. 07 - श्रीलंकेने टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात निर्धाराने आणि काहीशा मग्रूमीने खेळ करावा, असा सल्ला श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि श्रीलंका संघांमधला सामना गुरुवारी लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवण्यात येईल. श्रीलंकेला सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 96 धावांनी हार स्वीकारावी लागली होती, तर भारताने पाकिस्तानचा 124 धुव्वा उडवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान राखण्यासाठी श्रीलंकेला भारतावर मात करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुमार संगकाराने श्रीलंकेला भारताला हरवण्यासाठी कानमंत्र दिला आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या शिलेदारांनी टीम इंडियासमोर मान तुकवून मैदानात उतरु नये. त्यांनी निर्धाराने आणि मग्रूमीनं मैदानात उतरावं आणि सकारात्मक खेळ करावा, असं संगकाराने म्हटलं आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा दुसरा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तर अखेरचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 11 जूनला होणार आहे. भारताने एका सामन्यात विजय मिळवल्याने क्वालिफाय होण्यासाठी आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.