गोमती नदी प्रकल्प घोटाळा : आठ अधिका-यांवर एफआयआर दाखल
लखनौ, दि. 21 - अखिलेश यादव सरकारच्या काळात गोमती नदी विकासकामात झालेल्या घोटाळ्यांसंदर्भात जलसिंचन विभागातर्फे पहिला प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंत्यांसह आठ अधिका-यांचा समावेश आहे. 2015 मध्ये गोमती नदी किना-यावर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली 1 हजार 513 कोटी रुपये ॠरिव्हर फ्रंट योजना’ सुरू करण्यात आली. मात्र ही योजना निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण झाली नाही. या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्य अभियंता गुलेश चंद्र, एस.एन. शर्मा, काजिम अली यांची नावे प्राथमिक माहिती अहवालात आहेत. याशिवाय शिव मंगल यादव, अखिल रमन, कमलेश्वर सिंग, रूप सिंह यादव व सुरेंद्र यादव यांचाही समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी दिली. यातील चार अधिकारी निवृत्तही झाले आहेत.