Breaking News

अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

मुंबई, दि. 21 - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन अनिल कुंबळे पायउतार झाले आहेत. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त एनएनआयने  दिले आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांचा आज शेवटचा दिवस होता. प्रशिक्षकपदाचा करार सुरु ठेवण्यास अनिल कुंबळे यांनी असहमती दर्शवली  आहे. 23 जून 2016 रोजी टीम इंडियाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. कसोटीत सर्वाधिक विकेट्स काढणार्‍या  गोलंदाजांमध्ये मुरलीधरन आणि वॉर्ननंतर कुंबळे तिसर्‍या स्थानावर 1999 साली पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीच्या एकाच डावात दहा विकेट्स काढण्याची कामगिरी केली आहे.