Breaking News

शेतकर्‍यांवरील अन्यायकारक गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

नाशिक, दि. 03 - राज्यातील शेतकर्‍यांनी संपूर्ण ी करावी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या यासाठी दि.1 जून पासून संप सुरु केला आहे. या  संपात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांवर पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आ.जयवंतराव जाधव  यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आ.जयवंतराव जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यातील शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे दि 1 जून 2017 पासून राज्यातील शेतकर्‍यांनी  बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. संप सुरु होईल आणि आपोआप संपुष्टात येईल असे सरकारला वाटत होते की काय त्यामुळे शासनाने संपाबाबत गंभीरपणे पावले  उचलली नाही. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आणि आक्रमकपणे संपात उतरले. अनेक ठिकाणी आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे शेतकरी संतप्त  होवून या संपाला हिंसक वळण लागले. सध्या जो उद्रेक दिसत आहे, त्याबद्दल शेतकर्‍यांचा काहीही दोष नाही. पोलिसांनी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी 1 जून  च्या आंदोलनानंतर रात्री - पहाटे गावागावांत जाऊन दिसेल त्या शेतकर्‍यांना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. अटक केलेल्या या शेतकर्‍यांवर दरोडा तसेच जबरी  चोरी इ. गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. आंदोलक शेतकर्‍यांवर दरोड्याचे आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल करणे हे अतिशय अन्यायकारक आहे. शासनाने  आंदोलक शेतकर्‍यांवरील गुन्हे तातडीने मागे घेतले नाही तर शेतकर्‍यांमध्ये अधिक असंतोष निर्माण होईल. तरी, शासनाने आंदोलक शेतकर्‍यांवरील सर्व गुन्हे तातडीने  मागे घ्यावे, असे आमदार जाधव यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.