Breaking News

अहिल्यादेवी होळकर या सामाजिक क्रांतिकारक आदर्श राज्यकर्त्या : रामदास आठवले

नवी दिल्ली, दि. 01 - महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी पतिच्या निधनानंतर सती न जाता प्रजेच्या हितासाठी राज्य कारभार सांभाळला. त्या काळातील सती  प्रथा आणि महिलांनी राज्य कारभार करण्याची बंदी असताना या दोन्ही प्रथेविरुद्ध बंड करून उत्कृष्ट राज्य कारभार चालविलेल्या वेळ प्रसंगी तलवार हाती घेऊन  लढाई जिंकणार्‍या शुर महाराणी होत्या. त्यांच्या राज्यात जातिभेद नव्हता त्यांनी समतेच्या विचाराने आदर्श राज्य कारभार 28 वर्ष चालविला. त्यामुळे महाराणी  अहिल्यादेवी होळकर या सामाजिक क्रांतिकारक आदर्श राज्यकर्त्या होत्या, असे विचार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  आज व्यक्त केले. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतिदिनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतियांस हार्दिक शुभेच्छा दिल्या  आहेत.
अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या मुलीचा विवाह जातपात न बघता गुणवंत शुर तरुणाशी करून देण्याचे जाहिर केले होते. त्यांच्या राज्यात जातिभेद नव्हता त्यांचा  राज्य कारभारात प्रशासनावर वचक होता. त्या शांतताप्रिय आणि सुधारणावादी दानशुर कर्तुत्ववान राज्यकर्त्या होत्या, अशा शब्दांत आठवले यांनी अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंतिनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.