Breaking News

उंबरकर कुटूंबीयांना न्याय द्या ! चर्मकार उठाव संघाची धरणे आंदोलनात मागणी


चिखली,दि.11 : रुईखेड मायंबा येथील उंबरकर कुटूंबियावर व राधाबाई उंबरकर यांच्यावर जवळपास 25 ते 30 जातीयवादी नराधमांनी जीवघेणा, अमानवीय, अमानुषपणे अत्याचार केला आहे. त्यामुळे उंबरकर कुटुंबीयीसमवेत संपूर्ण चर्मकार समाज हादरला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असून मातृतीर्थ माँ साहेब जिजाऊंच्या बुलडाणा जिल्ह्यातच ही घटना घडल्यामुळे जिल्हाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पीडीत परिवाराचे सांत्वन करून त्यांना पाठिंबा, व धीर देऊन न्याय मिळवुन देण्यासाठी चर्मकार उठाव संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी पीडीत कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी चर्मकार उठाव संस्थापक अध्यक्ष अशोकराव कानडे, बाळासाहेब गायकवाड, विजय घासे, गौतम सातपुते, संजय बाविस्कर,  रामेश्‍वर उदे,  सोपान वाढे, नारायण कांबळे, हरेश्‍वर सावळे, योगेश
कडवे सौ.कमलबाई धामोणे, बुलडाणा विदर्भ प्रदेश संघटक विनोद खरे, गजेंद्र लहाने, धनराज शिपणे, गुळवे सर, खरात उपस्थित होते. 9 जून रोजी चर्मकार उठाव संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी पीडीत कुटुंबाची जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. बुलडाणा येथून लक्ष्मणदादा घुमरे, भूमी मुक्ती मोर्चाचे भाई प्रदीप अंभोरे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार बाबूरावजी माने, रामभाऊ कदम, शारदाताई नवले, रमाताई अहिरे, जग्गनाथ गायकवाड तर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदचे अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, शिवाजी जोहरे, पुरुषोत्तम बोर्डे, विनोद खरात, समाधान चिंचोले, शरद खरात यांच्यासह मोठया प्रमाणात कार्यकर्ते धरणे आंदोलनात उपस्थित होते. या सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांनी अत्याचारग्रस्त महिलेची, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या भेटी घेऊन निवेदन देऊन शासनाच्या स्तरावर आर्थिक मदत, गावामध्ये त्यांना होणारा त्रास, तसेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासंबंधी, तसेच आणखीही काही आरोपी मोकाट आहेत त्यांनाही अटक करण्याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याबाबत सुचविले आहे.