Breaking News

नाशिक जिल्ह्यात दीड हजार शेतक-यांवर गुन्हे

नाशिक, दि. 07 - शेतक-यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदो पाचव्या दिवशी जिल्ह्यात हिंसक आंदोलने झाली. तर शहर तसेच ग्रामीण भागातील अशा एकूण दीड  हजारपेक्षा अधिक शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी साडेतीनशे जणांना पकडून त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.
काल दिवसभरात जिल्ह्यात उंबरखेड, चाळीसगाव, दिंडोरी, वडाळभोई,मिठसागरे, सिन्नर, कळवण, चांदवड, अंबोली, अंजनेरी, त्र्यंबकेश्‍वर, जानोरी, वणी,  म्हाळसाकोरे, कनाशी, सटाणा, जानोरी, येवला तसेच नशिक शहरातील मेनरोड, शालीमार चौक, आडगाव भगूर या ठिकाणी आंदोलने झाली.
त्र्यंबकेश्‍वरला तीन्यांवर दगड फेक करत आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्या. गुरूवार पासून सुरू असलेल्या या आंदोलनात हिंसक वळण देणार्यांवर तसेच भाजीपाला  , दुध रस्त्यावर ओतणार्या अशा शेतक-यांवर आपर्यंत दिड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी सुमारे 350 जणांनाची धरपकड करून त्यांची  अखेर जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.
प्रामुख्याने शनिवारी रात्री दळवट येथे हिंसक जमावाने दगडफेक केल्याने पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले. होते यानंतर मात्र  पोलिसांनी घरात घुसून शेतक-यांची धरपकड केली.
दरम्यान, नाशिक शहरात येणारा भाजीपाला तसेच दूध अडवून त्याचे नुकसान करणा-यांना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी तयारी केली आहे. एक एसआरपीएफची  तुकडी शहरात हजर झाली असून, भाजीपाला तसेच दूधविक्री करण्यासाठी विरोध झाल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा कंट्रोल रुमशी संपर्क  साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सर्व पोलिसांच्या 4 ते 7 जून या कालावधीत सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. पोलिस स्टेशननिहाय पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. भाजीपाला व दूध  शहरात येण्यापासून रोखणा-या आंदोलनकर्त्यांना रोखणे आणि दुसरीकडे आलेला भाजीपाला आणि दुधाची सुरळीत विक्री सुरू ठेवणे यासाठी शहर पोलीस  प्रयत्नशील आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची तुकडी मागवण्यात आली असून, ती हजर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात काल सकाळी रस्त्यांवर आंदोलने झाली. विशेषतः शिंदे-पळसे, म्हसरूळ, आडगाव या रस्त्यांवर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करीत वाहनातील भाजीपाला  रस्त्यावर टाकला. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना बाजुला करीत वाहतूक सुरळीत केली. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केल्याचे  सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.