लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी बीसीसीआयची समिती
नवी दिल्ली, दि. 27 - लोढा समितीच्या कठोर शिफारशींपासून बीसीसीआयला आणि संलग्न असोसिएशन्सना वाचवण्यासाठी पदाधिकार्यांचा आटापिटा अजूनही सुरू आहे. बीसीसीआयच्या प्रशासनात लोढा समितीच्या शिफारशी सहजतेने कशा लागू करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
या समितीची उद्यापर्यंत स्थापना करण्यात येईल. तसंच बीसीसीआयशी संबंधित 5-6 सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात येईल. या समितीने लोढा समितीच्या शिफारशींपैकी लागू करण्यास कठीण असलेल्या शिफारशींचा अभ्यास करून, त्याविषयीचा आपला अहवाल 15 दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीला सादर करायचा आहे, अशी माहिती बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली.