अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित
ठाणे, दि. 07 - अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा प्रियकर विकी गोस्वामी यांना ठाणे सत्र न्यायालयानं फरार घोषित केलं आहे. इफेड्रीन अंमली पदार्थाप्रकरणात विकी गोस्वामी हा प्रमुख आरोपी आहे. न्यायालयानं ठाणे पोलिसांना दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापुरातील इव्होन लाईफ सायन्सेस कंपनीच्या आवारात अडीच हजार कोटीच्या अंमली पदार्थाप्रकरणी अनेकांना अटक झाली. मात्र अद्याप विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, ठाणे पोलिसांना या प्रकरणात 30 दिवसात अहवाल कोर्टात सादर करावा लागणार आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींना भारतात आणण्यासाठी रेडकॉर्नर नोटीस काढण्यात येईल. न्यायालय आरोपींच्या भारतात असलेल्या स्थावर मालमत्ता जप्तीचे अधिकार ठाणे पोलिसांना देतील अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.