Breaking News

हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं निधन

पुणे, दि. 09 - मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेहरुन्निसा दलवाई यांचं निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 11.30 वाजता मेहरुन्निसा  दलवाई यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या.
मेहरुन्निसा दलवाई या मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आणि क्रांतिकारी विचारवंत हमीद दलावाई यांच्या पत्नी. मेहरुन्निसा दलवाई यांच्या पश्‍चात इला कांबळी  आणि रुबिना चव्हाण या दोन मुली आहेत. हमीद दलवाई हयात असताना त्यांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत सर्वोतपरी सहकार्य मेहरुन्निसा यांनी केले. हमीद  दलवाई यांच्या निधनानंतरही मेहरुन्निसा यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळात सक्रीय सहभाग कायम ठेवला. मेहरुन्निसा दलवाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात  येणार आहे. मेहरुन्निसा दलवाई यांचा देह अंत्यदर्शनासाठी हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटल येथे ठेवण्यात येणार आहे.