कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहलीने मौन सोडलं!
पोर्ट ऑफ स्पेन, दि. 23 - कोहली-कुंबळे वादावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मौन सोडलं आहे. ड्रेसिंग रुममधील गोष्टी कधीच जाहीर करणार नाही, असं विराट कोहली म्हणाला. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी विराट कोहलीसोबतचे संबंध अस्थिर झाल्याचं म्हटलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरु होणार्या मालिकेआधी विराटने या वादावर पहिल्यांदा खुलेपणाने भाष्य करत त्याची बाजू मांडली. दरम्यान, कोहलीसोबतच्या मतभेदांमुळे अनिल कुंबळे यांनी तीन दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता.
कोहली म्हणाला की, राजीनामा देण्याच्या कुंबळेंच्या निर्णयाचा मी सन्मान करतो. शिवाय एक खेळाडू म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. अनिल भाईंनी त्यांचे विचार मांडले आणि पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्या या निर्णयाचा सन्मान करतो. स्पर्धेनंतर ही गोष्ट घडली आहे. माझ्यासाठी ड्रेसिंग रुममधील गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे, ज्या मी कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक करु शकत नाही. पण एक बाब निश्चित आहे, मी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान 11 पत्रकार परिषद घेतल्या. आम्ही मागील तीन-चार वर्षांत असा पायंडा घातला आहे की, ड्रेसिंग रुममध्ये घडलेल्या गोष्टी कधीही जाहीर केल्या नाहीत. त्याचं पावित्र्य कायम राखलं आहे. संपूर्ण संघाचा यावर विश्वास आहे. ते आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, असं विराट कोहलीने स्पष्ट केलं.
मी आणि संघातील खेळाडूंनी अनिल कुंबळेंचा कायमच आदर केला. एक क्रिकेटर म्हणून देशासाठी खेळताना त्यांनी जे योगदान दिलं, त्याचा मला आदर आहे. त्यांच्याकडून सन्मान, आदर हिसकावून घेऊ शकत नाही. आम्हा सगळ्यांनाच त्यांचा अभिमान आहे, असं कोहलीने सांगितलं. परंतु प्रशिक्षक कुंबळेंच्या भूमिकेबाबत भाष्य करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की, जसं मी आधीच सांगितलं की, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग रुममधील गोपनीयता कायम राखावी आणि रुममध्ये जे घडतं, ते आम्हा सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आणि खासगी असतं. ह्या गोष्टी मी सार्वजनिक करणार नाही. त्यांची बाजू त्यांनी मांडली आणि आम्ही सगळे त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.