विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या
कराड, दि. 10 (प्रतिनिधी) - काले, ता. कराड येथील विद्यार्थीनीने स्पर्धा परीक्षेतील अपयशाने निराश होऊन राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा महादेव साळुंखे (वय 26 रा. संजयनगर-काले ता. कराड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संजयनगर येथील महादेव साळुंखे आपल्या पत्नी व दोन मुले व एका मुलीसह नोकरीनिमित्त इचलकरंजी येथे काही वर्षापासून राहत आहेत. सुवर्णा हीचे एम कॉम पर्यंत शिक्षण झाले असून ती राज्य सेवेसह बँकींग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. या परीक्षेत सतत तिला अपयश येत होते. त्यामुळे ती नाराज होती. कालच ती इचलकरंजीहून आपल्या संजयनगर येथील घरी आली होती.
सायंकाळी सातच्या सुमारास तीने आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. तीचे चुलते यांनी सुवर्णा घरी जेवायला आली नाही म्हणून सुवर्णाच्या घरी आले तेव्हा तीचा मृतदेह त्यांना लटकलेला पहावयास मिळाला. त्यानंतर त्यांनी गावातील पोलिस पाटील यांना माहिती देवून कराड तालुका पोलीस ठाण्यात कळविले. अधिक तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.