Breaking News

पारपात्र कायद्याच्या 50 वर्षपूर्ती प्रित्यर्थ टपाल तिकिट जारी

नवी दिल्ली, दि. 24 - भारतामध्ये सार्वजनिक-खजगी भागीदारीच्या माध्यमातून पारपत्र जारी करण्याच्या इतिहासात पारपत्र सेवा प्रकल्पाचे अनन्य साधारण महत्त्व  आहे. संपूर्ण नागरी सेवा प्रदान प्रक्रिया प्रमाणित आणि स्वयंचलित करण्यात आली आहे असे दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मनोज सिन्हा यांनी आज सांगितले  . पारपत्र कायदा 1967/span50 वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिट जारी केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, पारपत्र जारी करणार्‍या सर्व प्राधिकरण 91 पारपत्र  केंद्र यांना एकिकृत करून ही सेवा प्रदान केली जात आहे.
भारतामध्ये पारपत्र जारी करण्याच्या इतिहासात 24 जून 1967 हा महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी राष्ट्रपतींनी पारपत्र कायदा 1967 ला मंजुरी दिली होती असे  सिन्हा म्हणाले. देशातल्या 235 टपाल कार्यालयांमध्ये दोन टप्प्यात पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 86 तर दुसर्‍या  टप्प्यात 194 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 52 केंद्र याआधीच सुरू झाली आहेत.