Breaking News

परळी कृ.उ.बा.स. सभापतीपदी सुर्यभान मुंडे, उपसभापतीपदी प्रा. विजय मुंडे बिनविरोध

परळी, दि. 23 - परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे सुर्यभान मुंडे तर उपसभापती पदी काँग्रेसचे प्रा.विजय मुंडे यांची बिनविरोध निवड  झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टि.पी.मुंडे यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे स्वागत करून  शुभेच्छा दिल्या. स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी ज्या पध्दतीने कृषी उत्पन्न बाजार समितीला विकासाच्या वाटेवर नेले त्याच पध्दतीने त्यांचा आदर्श ठेवुन काम करणार  असल्याचे नवनिर्वाचित सभापती सुर्यभान मुंडे यांनी सांगितले. 
एक महिन्यापुर्वी झालेल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलने  भाजपाच्या पॅनलचा दणदणीत पराभव करून मार्केट कमिटीवर आघाडीचा झेंडा फडकवला होता. त्यानंतर आज सभापती, उपसभापती निवडीसाठी बैठक बोलावण्यात  आली होती. या बैठकीत सभापती पदासाठी फक्त सुर्यभान मुंडे व उपसभापती पदासाठी प्रा.विजय मुंडे यांचाच उमेदवारी अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड  झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी जाहिर केले. निवडीनंतर फटाके, गुलालाची उधळण करीत विजयी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी  नवनिर्वाचित संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष अ‍ॅड.गोविंद फड, भाऊसाहेब नायबळ, राजाभाऊ पौळ, व्यंकटी गित्ते, सुर्यकांत मुंडे, सौ.सिंधुबाई गुट्टे,  सौ.भाग्यश्री जाधव, शिवाजी शिंदे, सौ.स्वाती माणिक फड, सौ.सिमिंता घाडगे, सौ.महानंदा गडदे, सुरेश मुंडे हे या निवडीच्या बैठकीला उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन पदाधिकार्यांनी धनंजय मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे यांनी भेट घेवुन आभार व्यक्त केले. त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. स्व.पंडितअण्णा मुंडे  यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन शेतकरी, व्यापारी, हमालमापाडी यांच्या हिताचा कारभार करावा अशी सुचना मुंडे यांनी दिली. निवडीच्या या प्रक्रियेवेळी जि.प.सदस्य  तथा राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, नगर पालिका गटनेते वाल्मिकअण्णा कराड, जि.प.सदस्य प्रदिप मुंडे, बबनदादा फड, पंचायत समिती सभापती मोहन  सोळंके, उपसभापती पिंटु मुंडे, जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, युवकचे माजी तालुकाध्यक्ष माणिकभाऊ फड, प.स.सदस्य  जानिमियॉ कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली दादा गडदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, सुरेश गित्ते, नगरसेवक भाऊसाहेब कराड व  ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी सदस्य इत्यादी उपस्थित होते.