भारताची घोडदौड, कांगारुंवर मात, टीम इंडियाचा नवा विक्रम
पोर्ट ऑफ स्पेन, दि. 27 - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या वन डे सामन्यात टीम इंडियाने तीनशे धावांचा टप्पा पार करुन एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताने विंडिजविरुद्ध 5 बाद 310 धावा केल्या. भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीनशेपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम तब्बल 96 वेळा केला आहे. या विक्रमासह भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.
ारताने आतापर्यंत 903 सामन्यात 96 व्यांदा 300 पेक्षा जास्त धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 891 सामन्यात 95 वेळा अशी कामगिरी केली आहे. असं असलं तरी भारताने गेल्या 622 सामन्यातच सर्वाधिक 300 पेक्षा जास्त धावा उभारल्या आहेत. त्यापूर्वीच्या सामन्यात हा आकडा गाठण्याचं प्रमाण कमी होतं. महत्त्वाचं म्हणजे भारताने पहिलं त्रिशतक 1996 मध्ये झळकावलं होतं. अन्य संघाच्या तुलनेत भारताने तीनशेचा आकडा गाठण्यास खूपच उशीर केला होता. मात्र तरीही अन्य संघापेक्षा सर्वात सुपरफास्ट 300 पेक्षा जास्त धावा करणारा संघही भारतच ठरला आहे.