Breaking News

जीव मुठीत धरुन विद्यार्थ्यावर शिक्षण घेण्याची वेळ

अहमदनगर, दि. 24 - सर्व शिक्षा अभियान आणि थेट एल ई डी ,टॅबलेट सारख्या आधुनिक सुविधाद्वारे गाव खेडयातील विदयार्थ्यांना ज्ञान संपन्न बनविण्याचे उपक्रम एका बाजूने राबविले जात असताना  हे शिक्षण ज्या वर्ग खोल्याच्या छताखाली बसून घ्यायचे आहे. त्या वर्ग खोल्याची दुरावस्था जर असेल तर शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्‍न शिक्षण घेणार्‍या विदयार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना  पडला नाही. तरच नवल. भिंतीला भेगा आणि छताला छिंद अशा परिस्थितीत पावसाळी वार्‍या वादळात जीव मुठीत घेवून शिकण्याची वेळ तालूक्यातील नानेवाडी शाळेतील विदयार्थ्यांवर आली आहे. 
सौताडा घाट डोंगर रागेच्या कुशीत वसलेल्या मोहा ग्रुप ग्रामंपचायतीत नानेवाडी हे गाव आहे. वाडीची लोकसंख्या अंदाजे 350 असून वाडीत 50 घरे आहेत. मोहा हे गाव आमदार दत्तक योजनेत असून गावाचे पालकत्व पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे आहे. याच गावात जिल्हा परिषदेची स्थापना 1962 साली झाली. त्यानंतर काही अवधीत दोन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. या वर्ग खोल्याचे बांधकामास सुमारे 50 वर्ष झाली आहेत. शाळेची इमारत  र्जीण झालेली असून भिंतीला भेंगा पडल्या आहेत.तसेच शाळेवरील पत्रे कुजल्याने पावसाच्या पाण्याच्या धारा थेट छतावरून वर्गातच कोसळतात.वर्गातील जूना काळात बसविलेली शहाबादी फरशी ही पूर्णत: उखडलेली आहे. नानेवाडी ही कानोबा डोंगराच्या कुशीत उभे असलेली ही शाळा अत्यंत मोळकळीस आली असून केव्हाही कोसळू शकते. याच शाळेत जीव मुठीत घेवून ग्लोबल इंडिया होवू पाहणा-या भारतातील विदयार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळा धड नाही तर धडे कसे शिकावेत. असा पेच त्यांच्या समोर असला तरी  शिक्षण व्यवस्थेशी संबंधीत असणा-या प्रशासकीय यंत्रणेची त्याकडे अक्षम्य डोळे झाक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘पत्रयावरचा दगड पडला...... पावसात शाळा गळली आणि आमची पुस्तके भिजली या ’ या नानेवाडी शाळेतील लहानग्या लेकरांच्या सहज प्रतिक्रिया आहेत. पण त्या यंत्रणेतील मातब्बर अधिकार्‍यांना ऐकू जातील का ? हाच खरा प्रश्‍न आहे.
शाळेला दोन वर्ग खोल्या नव्याने मंजूर होण्यासाठी मोहा ग्रामपंचायतीने 15 ऑग्रस्ट 2016 ग्रामसभेत ठराव मंजूर केला.  संबंधीत ठरावाची प्रत आणि  निवेदन  यंत्रणेस देण्यात आले. त्यानंतर पून्हा आदर्श ग्राम योजना आढावा बैठकीत 27 मे 2017 रोजी ही बाब निदर्शनास आणून दिली.  शाळेचे मुख्याध्यापक व ग्रामस्थांचे निवेदन शिक्षण विभागास  1 जुन 2017 लाही देण्यात आले. मात्र आजपर्यंत हा विषय मार्गी लागला नाही. त्यामुळे ‘गळक्या शाळेत शिकावं कसं’ नानेवाडीत विदयार्थ्यांसमोरील प्रश्‍न अदयापही कायम आहे.