Breaking News

डॉ. सुजय विखे पॅटर्नच शेतकर्‍याला तारू शकतो...


आम्ही ना कुठल्या राजकीय पक्षाचे समर्थक आहोत ना विरोधक. ना कुणाचे हस्तक दलाल ना कुणाचे विरोधक, लोकशाहीत जनतेचे अश्रू पुसण्यासाठी धडपडणारा कुणीही असो, त्याचे मात्र आम्ही स्तुती पाठक.सर्व दुर शेतकर्‍यांच्या टाळूवरचा मलिदा वापरून राजकीय फोडणी देणार्‍याच्या भाऊगर्दीतही एक माणूस आपल्या कुटुंबाची सारी ताकद आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे उध्वस्त झालेले कुटुंब पुन्हा उभे रहावे म्हणून धडपड करतोय.. त्या डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांना बळ मिळावे म्हणून ही दखल...
जुनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात बांधावरचा शेतकरी रस्त्यावर आला होता. ठिकठिकाणी रस्त्यावर टोमटो, कोबी, फ्लावर, कांदा या भाजीपाल्यासह दुध रस्त्यावर फेकीत होता. शेतकर्‍यांच्या डोक्यात पाणी झालं म्हणून हा सारा गोंधळ सुरू नव्हता तर पिढ्यान पिढ्या शेती करूनही परिस्थितीत बदल घडत नाही, कर्ज वाढत आहे.शेतकरी बंधू आत्महत्या करीत आहे.या परिस्थितीला कुणा एका पक्षाचे सरकार नव्हे तर व्यवस्थेत बसलेल्या प्रवृत्ती जबाबदार आहेत म्हणून तो आत्मक्लेश या मार्गाने व्यक्त करू पहात होता. आपल्या सोबत कोण आणि विरोधाता कोण याचा हिशेब मांडण्याचे भान त्याला नव्हते. त्याचाच फायदा काही चाणाक्ष राजकारण्यांनी घेतला आणि हे आंदोलन आपल्या पक्षाच्या दावणीला कसे बांधता येइल यासाठी खलबतं राजकारणी मंडळी करू लागली. कोण होती ही राजकीय मंडळी? सात पिढ्या जळणार नाही एव्हढी संपत्ती कमावलेले सारे प्रतिष्ठीत ठग आंदोलन कह्यात घेण्यासाठी धडपडत होते. त्यांना शेतकरी करीत असलेल्या उद्वेगाशी कुठलेच सोयरं सुतक नव्हतं, या उद्रेकाने तापलेल्या तव्यावर त्यांच्या राजकीय पक्षाची पोळी भाजून घ्यायची होती. वास्तविक वर उल्लेख केल्याप्रमाणे या मंडळींकडे प्रचंड संपत्ती आहे. प्रत्येक
तालुक्यात अशी संपत्ती कमावलेले कमीत कमी पाच नेते हयात आहे.त्यांनी ही संपत्ती कमविण्यासाठी उन्हातान्हात पावसापाण्यात कष्ट केलेत असेही नाही. जनतेच्या कृपेने त्यांचे उखळ पांढरं झालं आहे. आंदोलन हायजॅक करण्यासाठी जेव्हढी धडपड ही मंडळी करीत होती त्याऐवजी आपल्या संपत्तीतील दहा टक्के भाग बाजूला काढून आपल्या तालूक्यातील संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवासाठी वापरण्याचे सौजन्य दाखवले असते तर आंदोलनात सहभागी होण्याची केविलवाणी धडपड करण्याची
नौबतच आली नसती. मात्र ती दानत कुणीच दाखवली नाही. महाराष्ट्रभर राजकीय नेत्यांकडून आंदोलन हायजक करण्याचा प्रयत्न सुरू असतांना एक तरूण नेता मात्र शांत डोक्याने शेतकर्‍याच्या एकूण हतबलतेवर मंथन करीत होता. होय! ज्यांच्या तीन पिढ्या देशाच्या राजकारणात, समाजकारणात भरीव योगदानासाठी नेहमीच चर्चेत राहतील त्या प्रवरानगरच्या विखे घराण्याचे चौथे वारसदार... विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपत्र डॉ. सुजय विखे... हा तरूण नेता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे राजकारण न करता समस्येच्या गर्तेतून शेतकर्‍याला बाहेर कसे काढता याविषयी विचार करीत होता. तसं पाहीलं तर विखे कुटुंबाचे अन् शेतकर्‍याचे ऋणानुंबध वंशावळीचे. कुळ, कुंडली, गोत्र, अत्र तत्र, सार एकच. विखे कुंटुब शेतकर्‍याहून वेगळे नाहीच. शेतकर्‍यांसाठी राबणं हा त्यांचा पिढीजात कार्यक्रम...सातत्याने अंमलबजावणीही सुरू
आहे. मात्र परिस्थितीचा वरवंटा अनेक शेतकर्‍यांच्या संसारावर फिरला. अनेकांना आत्महत्या करण्याचे दुर्दैव ओढवले.अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कर्ता पुरूष गमावल्याने अनेक कुंटुब उघड्यावर पडले, कित्येक रस्त्यावर आले. ही परिस्थिती बघून डॉ.विखे मन व्यथित झाले. शेतकरी संपाचा राजकीय फायदा तेही घेऊ शकत होते पण चार पिंढ्यांचे शेतकरी सेवेचे संस्कारी ऋणानुंबंधांनी त्यांना परवानगी दिली नाही, या परिस्थितीत राजकारण नाही तर समाजकारण आवश्यक असल्याचा आदेश त्यांच्या अंतर्मनाने दिला आणि तात्काळ एक योजना आखली जाहीर केली आणि अंमलबजावणीही सुरू झाली. पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुंटुब सहाय्यता योजना हीच ती योजना. या योजने अंतर्गत आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे कुंटुब दत्तक घेऊन त्याची जबाबदारी विखे यांचे जनसेवा प्रतिष्ठान घेत आहे.
घराच्या डागडुजीपासून मुलामुलींचे शिक्षण, कुंटुबाचे आरोग्य इतकेच नव्हे तर त्या कुंटुबातील मुलींचे कन्यादानही जनसेवाच करणार आहे. मग आता सांगा डॉ. विखे यांना जे शक्य झालं ते ते संप हायजॅक करू पाहणार्‍या अन्य राजकीय पुढार्‍यांना शक्य नाही का? नक्कीच पण त्यासाठी हवी आहे प्रामाणिक इच्छा शक्ती...!