सात दिवसांनंतर लातुरच्या बाजार समितीचा बाजार फुलला
लातूर, दि. 09 - सात दिवसांनंतर लातुरच्या बाजार समितीचे कामकाज सुरु असून आज लातुरच्या बाजारात सोयाबीन 2790, हरभरा 5350 तर तूरील 3983 असा भाव होता. तर, शेतकरी शेतीत झालेला माल सडवायचा, दूध फेकून देण्याच्या मनस्थितीत नसून बाजारात भाजीपाला मोठया प्रमाणात दाखल झाला.
मागच्या पाच दिवसांपासून झालेली लातुरची भाजीपाला कोंडी आज ब-यापैकी फुटली. लातुरच्या भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात आज साठ टक्क्यांपर्यंत आवक झाली. किरकोळ विक्रेत्यांनी आलेला माल फटक्यात संपवला. या बाजारातून आठवडाभराची भाजी खरेदी करण्याचीही पद्धत आहे. ठोक भावात मिळणारी भाजी कितीतरी स्वस्त असते. त्यामुळे सामान्य ग्राहकांनीही आज या बाजारात गर्दी केली होती. संपासाठी भाजी बाजार किती दिवस बंद ठेवायचा, शेतातली भाजी शेतातच किती दिवस ठेवायची? असा प्रश्न सामान्य शेतकरी करतात. तर शेतीच्या कामासाठी शेतकर्यांनी कंबर कसली असून बी बियाणे आणि खतांचा बाजारही फुलला आहे.