Breaking News

’नीट’मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा

नवी दिल्ली, दि. 24 - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तर्फे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट म्हणेजच नीट 2017 परीक्षेचा निकाल जाहीर  करण्यात आला आहे. पंजाबच्या नवदीप सिंगने 697 गुण मिळवत मुलांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून पहिला आलेला पुण्यातील अभिषेक डोग्रा  देशात पाचवा आला आहे.
cbseneet.nic.in या वेबसाईटवर नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. अव्वल क्रमांकानुसार प्रत्येक परीक्षार्थीचा पर्सेंटाईल  काढून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. या मेरीट लिस्टनुसार एमबीबीएस किंवा बीडीएसच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. 28  जूनपासून मेडिकलच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे.