गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी गोपीनाथ गडावर राज्यभरातून उसळला जनसागर
परळी, दि. 04 - अठरापगड जातीधर्माच्या लोकांच्या उन्नतीसाठी जीवनभर कार्य करणार्या गोपीनाथ मुंडे यांची ओळख ही देशातील अग्रभागी नेत्यांमध्ये आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे लोकविलक्षण नेतृत्व होते. त्यांचा वारसा व जनसेवेचा वसा पुढे चालवूया असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. राज्य सरकार लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळेच त्यांना अभिप्रेत असाच निर्णय आम्ही घेतला असून त्यांच्या स्मृतिदिनी राज्यातील अल्पभूधारक शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.तर जीवनात मुंडे साहेबांचा वसा व वारसा चालवताना जनसेवा हे आपले मुख्य तत्व आहे. आमचे नाते जनतेच्या सुख दुःखाशी असून अविरतपणे लोकांच्या पीडा दुर करण्यासाठी कटिबद्ध राहू असा खंबीर विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत, खा.सुनील गायकवाड, आ.सुजीत सिंह ठाकुर,आ.सुधाकर भालेराव, आ.संगीता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख,आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मन पवार, आ.मोनिका राजळे, आ. मोहन फड, आ. तानाजी मुटकुळे,आ.विनायक मेटे, रासप नेते अमित पालवे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.आ.केशव आंधळे, माजी आ. पाशा पटेल,माजी आ.विजय गव्हाणे, प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे , रत्नाकर गुट्टे, ज्ञानोबा मुंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे समाधीस्थळाचे दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी प्रास्ताविक आ. आर. टी. देशमुख यांनी केले. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन भाजप प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड यांनी केले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की, गोपीनाथराव मुंडे यांनी जीवनभर असमतेविरुद्ध संघर्ष केला. 1995 ला राज्यात युतीचे सरकार आणून त्यांनी सत्तांतर घडवून दाखवले. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही महाराष्ट्रातुन सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी त्यांचे योगदान राहिले. लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकविलक्षण नेतृत्व होते.त्यांच्या जनसेवेचा विचार सदैव प्रेरणा देत राहील.परळी - बीड - नगर या रेल्वेचे त्यांचे स्वप्न साकार होत आहे. 2019 ला ही रेल्वे निश्चित सुरू होईल असे सांगून गोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी विशेष रेल्वे गाडीने लोक येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पंकजा व डॉ. प्रितम या माझी बहिण आहेत असा गौरव करून त्यांच्या पाठीशी आपण सदैव उभे आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले की, 3 जुन हा मुंडे साहेबांचा स्मृतीदिन हा मार्गदर्शक नेतृत्व हरवल्याचा दिवस आहे परंतु ज्या ज्या वेळी प्रश्न पडतो त्यावेळी आम्ही मुंडे साहेबांकडे पाहतो.त्यामुळे हा प्रेरणा देणारा दिवस आहे. त्यांच्या विचाराचे सरकार राज्यात आहे. त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेला कारभार आमचे सरकार करत आहे. समाजातील प्रत्येक समाजघटक विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न आहे. हे शेतकर्यांचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील शेतकर्यांना सगळ्यात मोठी कर्जमाफी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकर्यांना संपूर्णतः कर्जमुक्तीचा निर्णय लोकनेत्याच्या स्मृतिदिनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 80 टक्के शेतकरी कर्जमुक्त होणार आहे असे त्यांनी सांगितले.