भिवंडीच्या महापौरपदासाठी एक-दोन नव्हे, तब्बल 9 अर्ज दाखल
भिवंडी, दि. 06 - भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 9 जून रोजी निवडणूक होणार असून महापौरपदासाठी आज 9 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पूर्ण बहुमतात असलेल्या काँग्रेससह शिवसेना, भाजप आणि भाजपचं समर्थन असलेल्या कोणार्क विकास आघाडीनंही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 9 तारखेला नेमकं काय होतं? याकडे भिवंडीकरांचं लक्ष लागलं आहे.
भिवंडी महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक 24 मे रोजी झाली होती. त्यानंतर 26 मे रोजी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र भिवंडीचा आजवरचा इतिहास आणि फोडाफोडीचं राजकारण पाहता बहुमतात असूनही काँग्रेसचाच महापौर होईल, असं छातीठोकपणे कुणी सांगू शकत नाही. काँग्रेसनं माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी यांना रिंगणात उतरवलं असून भाजपतर्फे खासदार कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील, प्रकाश टावरे आणि शाहीन फरहान सिद्दीकी यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर भाजपच्या साथीनं लढलेल्या कोणार्क विकास आघाडीनं माजी महापौर विलास पाटील यांचा अर्ज दाखल केला असून शिवसेनेनं विद्यमान महापौर तुषार चौधरी आणि मदन नाईक यांचे अर्ज दाखल केले आहेत.
भाजप खासदार कपिल पाटील हे त्यांचे पुतणे सुमित पाटील यांना महापौरपदी बसवण्याच्या प्रयत्नात असून यासाठी त्यांनी मातोश्रीला साकडं घातल्याचं समजतं आहे. या सगळ्यात काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून त्यामुळं 9 जून रोजी कुणाचा महापौर बसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.