Breaking News

एपीएमसीत 275 गाड्या भाजीपाल्याची आवक

नवी मुंबई, दि. 04 - राज्यातील शेतक-यांचा संप सुरू असल्याने परराज्यातील शेतकर्यांनी मोङ्ग्या प्रमाणात भाजीपाला वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाठविला  होता. आज सायंकाळी 4 पर्यंंत 275 ट्रक व टेंपो इतका भाजीपाला मार्केटमध्ये आला व सर्व मुंबई व उपनगरात किरकोळ विक्रेत्यांमार्फत गेला आहे. यामध्ये 200 हून  अधिक गाड्या परराज्यात आल्या होत्या. घाऊक बाजारामध्ये भाजीपाल्याचे भाव दीड ते दोन पटीने वाढले असले,तर प्रत्यक्षात किरकोळ व्यापा-यांनी 70 ते 100  रुपये किलो पर्यंत कृत्रिम भाववाढ करून ग्राहकांना वेठीस धरल्याचे चित्र शहरात होते. वाशी घाऊक बाजारातील सरासरी बाजार भाव टॉमेटो -38, भेंडी - 32,  कोबी - 20, ्फ्लावर -26,कारली - 20,पडवळ - 23, वांगी - 22, शेवगा - 32, कोथिंबिर (जुडी)- 20, मेथी - 16, पालक- 10 असे आहेत. परराज्यातून  वांगी, पडवळ, भेंडी, कोबी, कारली, शिमला आदी भाज्यांची आवक झाली आहे. मुंबई व उपनगरात 500 ते 550 गाडी भाजीपाला दररोज पाठविला जातो. काल  केवळ 20 टक्के भाजीपाला मार्केटमध्ये आला होता. आज त्यात वाढ होऊन 40 ते 45 टक्के भाजीपाला मार्केटमध्ये आला होता. नियमितच्या बाजारभावा तुलनेत दीड  ते दोन पटीने आज भाजीपाल्याचे बाजारभाव झाले होते, अशी माहिती मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.