Breaking News

पाकिस्तानमधील दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात 18 ठार; 100 जखमी

कराची, दि. 24 - पाकिस्तानमधील पारचिनारक परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात 18 नागरिक ठार झाले आहेत. तर 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
पहिला स्फोट हा पारचिनार येथील एका बाजारात झाला. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करत असताना दुसरा स्फोट झाला. हे हल्ले गर्दीच्या ठिकाणी करण्यात आले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. या घटनेनंतर येथील परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले. ईंदनिमित्त अनेक जण खरेदीसाठी बाजारात आले होते. त्यामुळे येथे नागरिकांची गर्दी झाली होती. स्फोटानंतर पोलिसांनी परिसराला घेराव घालून शोधमोहिम सुरू केली.