Breaking News

इराण दहशतवादी हल्ल्यानं हादरला, साखळी हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू

तेहरान, दि. 08 - ‘इस्लामिक स्टेट’सह सुन्नी दहशतवादी संघटनांचं लक्ष्य असलेला इराण आज साखळी हल्ल्यांनी हादरला. दहशतवाद्यांनी इराणची संसद, दिवंगत  नेते अयातुल्लाह खोमेनी यांचं स्मारक आणि तेहराणमधील मेट्रो स्थानकावर एकाच वेळी हल्ला चढवला. या हल्ल्यांत आठ लोक जखमी झालेत आहेत. तर 12 जणांचा  मृत्यू झाल्याची माहिती आहे. सकाळी चार बंदुकधारींनी संसद परिसरात अंदाधुंद गोळीबार केला. तर आणखी एका आत्मघातकी स्फोटात एका हल्लेखोरानं स्वतःलाच  संसदेत उडवलं. यात 5 जणांचा मृत्यू झाला.
दुसरा हल्ला अयातुल्लाह यांच्या स्मारकावर दुसरा हल्ला झाला. इथेही दोन दहशतवाद्यांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं. तर एकाला सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातलं  संसदेवरील हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती इराणमधील निम सरकारी न्यूज एजन्सीने दिली आहे. तीन सशस्त्र हल्लेखोरांनी  इराणच्या संसदेत शिरकाव केला होता. त्यानंतर काही जणांना ओलिस ठेवल्याचंही म्हटलं जातं. हल्ल्याचं कारण आणि हल्लेखोराची ओळख अद्यापही अस्पष्ट आहे.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा कमिटीचे प्रवक्ते हुसैन  नघवी हुसैनी यांनी सांगितलं. या घटनेनंतर संसदकडे येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर इराणच्या गृहमंत्र्यांनी तेहरान प्रोविन्स सेक्यूरिटी  काऊंसिलमध्ये तातडीची बैठक बोलावली होती.