Breaking News

दानवे यांच्या राजीनाम्यासाठी आसूडचे वाचन

औरंगाबाद, दि. 29 - भारतीय जनता पक्षाचे प्रदेश रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांविषयी काढलेल्या कथित अवमानकरक उल्लेखामुळे त्यांचा निषेध करत त्यांचा  राजीनामा मागण्यासाठी स्वतःला किसानपुत्र म्हणविणा-यांनी येथील क्रांतीचौकात ज्योतीबा फुले यांच्या आसूड या ग्रंथाचे सामुहिक वाचन करत आंदोलन केले. दानवे  यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भोकरदन येथे दानवे यांच्या निवासस्थानासमोर उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली  त्याचा निषेध करत त्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी या आंदोलकांनी मागणी केली आहे. शेतक-यांची तूर संपेपर्यंत हमीभावाने तिची  खरेदी करावी, दानवे यांनी राजीनामा द्यावा अशी या आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलकांमध्ये अक्षय पुराणिक, सद्दामखान आदींचा समावेश होता.