Breaking News

काश्मीरमधील चकमकीत दोन जवान शहीद

श्रीनगर, दि. 21 - घुसखोरीचा प्रयत्न करताना हंदवाडा परिसरात दहशतवादी व सशस्त्र दलात चकमक झाली. त्याला प्रत्त्युत्तर देताना लष्कराचे दोन जवान  शहिद झाले, तर दोन दहशतवादी ठार करण्यात यश आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हंदवाडा जंगलात दहशतवादी लपून बसले होते.
लष्कराने घुसखोर दहशतवाद्यांविरोधात एक व्यापक मोहिम सुरू केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती  मिळाली होती. त्या माहितीनुसार हंदवाडा पोलीस व राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या भागाला घेराव घातला. घटनेची गांभीर्यता लक्षात घेता  विशेष दलाच्या कमांडोंनाही पाठवण्यात आले होते.