सफरचंदासाठी प्रसिद्ध दक्षिण काश्मीर बनतोय दहशतवादाचा अड्डा
श्रीनगर, दि. 21 - काश्मीर खो-यात गेल्या काही कालावधीपासून अशांततेचे वातावरण आहे, मात्र दक्षिण काश्मीरचा परिसर हा दहशतवादाचा अड्डा बनत असल्याची बाब सुरक्षा दलांसाठी दिवसेंदिवस मोठी डोकेदुखी ठरत आहे. गुप्तचर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काश्मीर खो-यातील 10 जिल्ह्यात सुमारे 200 दहशतवादी सक्रीय आहेत. त्यापैकी 90 दहशतवादी हे केवळ दक्षिण काश्मीर परिसरात कार्यरत आहेत. एकेकाळी सफरचंदासाठी लोकप्रिय असलेल्या पुलवामा, अनंतनाग, शोपिया आणि कुलगाम या चार जिल्ह्यात दहशतवादी तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे वारंवार या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत असतात.
जम्मू काश्मीरमधील भाजपचा पाठिंबा असलेल्या पीडीपी सरकारमध्ये राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे या परिसरात दहशतवादाचे अड्डे तयार झाले असून दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढू लागले असल्याचे मत विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.