वरूण गांधींनी स्विकारले अण्णा हजारेंचे आमंत्रण, राळेगणसिद्धीला भेट देणार
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय जनता पक्षाचे नेते व खासदार वरूण गांधी पुढील महिन्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावाला भेट देण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी वरूण यांना येथे येण्याचे आमंत्रण दिले असून ते वरूण यांनी स्विकारले आहे.
यापूर्वी अकार्यक्षम, भ्रष्ट लोकप्रतिनिधींना परत बोलावण्यासाठी कायदा करावा अशी मागणी वरूण गांधी यांनी केली होती. त्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांना पत्र लिहून असा कायदा होण्याला आपले समर्थन वरूण यांना कळवले होते. अण्णा हजारे यांच्या समर्थन पत्रानंतर वरूण यांनी या मुद्द्यावर भाजपतील नेत्यांनीही चर्चा करावी, असे ट्विट केले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही याबाबत समर्थन मागितले आहे.