आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मालेगावातील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु
नाशिक, दि. 27 - शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह मालेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांना गुणानुक्रमाने प्रवेश देण्यात येणार असून माध्यमिक विभागातील इयत्ता 8वी , 9 वी, 10 वी साठी 15 जून 2017 पर्यंत प्रवेश अर्ज घेऊन जाणे गरजेचे आहे.
तसेच उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता 11 वी सर्व शाखा निकाल लागल्यापासून 10 दिवसांचे आत, इयत्ता 12 वी कला, वाणिज्य व विज्ञानच्या शाखांसाठी 15 जून 2017 पर्यत आणि महाविद्यालयीन सर्व शाखा महाविद्यालयाचे निकाल लागल्यापासून 10 दिवसांचे आत प्रवेश घ्यावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पात्र विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन गृह प्रमुख, शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, मालेगाव यांनी केले आहे.
प्रवेशासंबंधी माहिती पत्रक, अर्ज व आदेशपत्र वसतिगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत विनाळिणार आहेत. ई. बी. सी सवलत धारक गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापर्यंत असावे. या वसतीगृहात विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची व्यवस्था विनामुल्य आहे. पुर्नप्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक आहेत . त्यापेक्षा कमी गुण असलेल्या व स्थानिक पाल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.