रत्नागिरीत सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी भौतिकोपचार केंद्र लवकरच
रत्नागिरी, दि. 27 - रत्नागिरीत सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी भौतिक उपचार केंद्राची लवकरच सुरवात होणार आहे. याकरिता मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला आहे.
गेल्या महिन्यात मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या वतीने सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी शिबिर घेण्यात आले. रत्नागिरी व चिपळूण या दोन ठिकाणी शिबिर घेऊन त्यात मुलांची सर्व तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील सेरेब्रल पाल्सीच्या 237 रुग्णांचा समावेश होता. शिबिराचा पुढील टप्पा म्हणून गरजेनुसार या रुग्णांवर शस्त्रक्रिया व व्हीलचेअर्स इतर उपकरणांचे वाटप व भौतिकोपचार करण्यात येणार आहेत. भौतिक उपचार हा या रुग्णांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याकरिता भौतिक उपचार केंद्र सुरू होणार आहे. परटवणे परिसरातील फिनोलेक्स कॉलनीच्या परिसरात सुरू होणार असलेल्या या केंद्राच्या उद्घाटनाला आमदार उदय सामंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित राहणार आहेत. भौतिक उपचार केंद्राचा जास्तीत जास्त लाभ सेरेब्रल पाल्सीग्रस्तांनी घ्यावा, असे आवाहन फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने केले आहे.