Breaking News

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन

नवी दिल्ली, दि. 24 - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास  घेतला. 1990 च्या दशकात चंद्रास्वामी हे नेहमी चर्चेत असत. पीव्ही नरसिंहराव हे पंतप्रधान बनल्यानंतर चंद्रास्वामी हे आणखी चर्चेत आले. चंद्रास्वामी हे पीव्ही  नरसिंहराव यांचे अध्यात्मिक गुरु होते, असेही म्हटले जाते. 1991 मध्ये ज्यावेळी पीव्ही नरसिंहराव पंतप्रधान बनले, त्यानंतर चंद्रास्वामी यांनी दिल्लीत आश्रम बांधला.
अनेक नेते-अभिनेते चंद्रास्वामींचे अनुयायी होते. शिवाय, इंग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थेचर याही त्यांच्या चाहत्या होत्या. माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी  आपल्या ‘वॉकिंग विथ लायन्स-टेल्स फ्रॉम अ डिप्लोमेटिक पास्ट’ या पुस्तकात लिहिले आहे की, चंद्रास्वामींच्या माध्यमातूनच आपण 1975 साली इंग्लंडमध्ये  मार्गारेट थेचर यांना भेटलो होतो.