दिल्ली विधानसभेत आप आमदारांकडून कपिल मिश्रा यांना मारहाण
नवी दिल्ली, दि. 01 - दिल्ली विधानसभेत बुधवारी आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले कपिल मिश्रा यांना मारहाण करण्यात आले. मार्शलच्या मदतीने मिश्रा यांना सभागृहाच्या बाहेरही काढण्यात आले.
या घटनेनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पाच मिनिटे बोलण्याचा वेळ मागितला होता. मदनलाल व अमानतुल्ला खान या सारख्या काही आमदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिल्यास आपला दावा खरा असल्याचे पटेल, असे ते म्हणाले. मला मारहाण करण्यात येत होती तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हसत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. अलिकडेच मिश्रा यांनी दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.