Breaking News

बाबरी मशीद प्रकरण : रामविलास वेदांतीसह तीन जणांची न्यायालयासमोर शरणागती

नवी दिल्ली, दि. 21 - बाबरी मशीद प्रकरणी रामविलास वेदांती, चंपत राय, बी.एल.शर्मा, महंत नृत्यगोपाल दास आणि धर्मदास यांनी आज लखनौमधील  केंद्रीय विभागाच्या विशेष न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे.बाबरी मशीद पाडण्यात लालकृष्ण अडवाणी यांचा हात नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी  खासदार वेदांती यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते.बाबरी मशीद पाडण्यामध्ये आपली महत्वाची भूमिका असल्याचेही वेदांता यांनी कबूल केले आहे. केंद्रीय अन्वेषण  विभागाने बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी 13 जणांवर आरोप केले होते. या आरोपींमध्ये वेदांती यांच्या नावाचाही समावेश आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद  पाडण्यात आली होती.