इंग्लंड-बांगलादेशच्या लढतीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं बिगुल वाजणार
लंडन, दि. 01 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेश संघांत लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर उद्या होत असलेल्या सामन्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीची सलामी दिली जाईल. या सामन्यासाठी प्रेक्षकांना वेळेत स्टेडियममध्ये येण्याचा इशारा देण्यात येत आहे. तुम्ही थोडासा उशीर केलात तरी सामन्यातल्या निर्णायक क्षणांना मुकाल याची त्यांना जाणीव करून देण्यात आली आहे.
या इशार्याचं कारण आहे इंग्लंडमधलं सध्याचं कुंद आणि ढगाळ वातावरण. या वातावरण चेंडू अधिक स्विंग होतो. त्यामुळं फलंदाजी करणार्या संघाची घसरगुंडी उडते. सोमवारी लंडनच्या लॉर्डसवर तेच घडलं. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबादा आणि वेन पार्नेलनं यजमान इंग्लंडची पाच षटकांत सहा बाद 20 अशी दाणादाण उडवली होती. भारतीय गोलंदाजांनी तर मंगळवारी बांगलादेशचा अवघ्या 84 धावांत खुर्दा उडवला आणि 240 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या दोन सामन्यांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या संघांनी इंग्लंडमधल्या वातावरणाचा चांगलाच धसका घेतला आहे.