मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या वाढली
नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आजवर जम्मू काश्मीरमधील दहशतवादाशी निगडीत मृत्यूंमध्ये वाढ झाली असून ते प्रमाण 42 टक्क्यांवर पोहोचले आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे, असे दक्षिण आशिया टेररिझम पोर्टलने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. काँग्रेस सरकारच्या शेवटच्या तीन वर्षाच्या कालावधीत दहशतवादी कारवायांमध्ये शहीद झालेल्या जवानांची संख्या 111 होती. भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या कालावधीत ही संख्या 191 वर पोहोचली. 24 मे 2017 पर्यंतचे माध्यमांचे वृत्तांकन व अहवाल यांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला आहे.
या अहवालानुसार भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या कालावधीत जम्मू-काश्मिरमधील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण 37 टक्क्यांनी वाढले असून या कालावधीत दहशतवादी ठार झाल्याच्या संख्येतही 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या तीन वर्षात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमुळे 293 जणांचा मृत्यू झाला. याच सरकारच्या कार्यकाळाच्या दुस-या वर्षी ही संख्या 191 च्या घरात होती.
मात्र उत्तर-पुर्वेकडील अतिरेकी हल्ल्यांचा विचार केला तर ते प्रमाण काँग्रेस सरकारच्या कार्याकाळात अधिक होते. काँग्रेसच्या शेवटच्या तीन वर्षात तेथे 874 हिंसाचाराच्या घटना घडल्या. तर भाजपच्या काळात हे प्रमाण 12 टक्क्यांनी घटले. मात्र भाजपच्या काळात हे क्षेत्र सुरक्षा दलासाठी अधिक धोकादायक ठरले. या भागातील अतिरेकी हल्ल्यामुळे होणा-या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही भाजप सरकारच्या काळात कमी झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.