Breaking News

पक्षाचा प्रमुख म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री नात्याने पंतप्रधानांशी भेट - नितीश कुमार

नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट संयुक्त जनता दलाचा प्रमुख म्हणून नाही तर बिहारचा मुख्यमंत्री या नात्याने होती. ही बैठक राजकीय नव्हती. माध्यमे यातून वेगळा अर्थ का काढत आहेत, असा प्रश्‍न बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज येथे विचारला. पंतप्रधान व नितीश कुमार यांच्या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.
या भेटीनंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद्र जगन्नाथ यांच्यासाठी आयोजित केलेल्या भोजनालाही नितीश कुमार यांना निमंत्रित करण्यात आले होते. गंगा नदीची समस्या गंभीर आहे. तेथे महापूरचा धोका निर्माण होतो. या विषयावर पंतप्रधानांशी वेगळी चर्चा केली पाहिजे, असा विचार केल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. मी कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.