भारतीय अन्न महामंडळ महाराष्ट्र राज्य कमिटीच्या सदस्यपदी राजेश चौधरी
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - भारतीय अन्न महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या कमिटीच्या सदस्यपदी येथील भारतीय जनता पार्टीचे नेते राजेश चौधरी यांची निवड करण्यात आली.
भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील अन्न गोदामाच्या सुयोग्य व्यवस्थापन त्यात आवश्यक सुधारणा, प्रनालीचे प्रभावी संचलन, अन्नधान्याची शास्त्रीय साठवणूक व पुरवठा आदीचे बळकटीकरण करण्याच्या हेतूने सामान्य नागरीकांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय कमिटीची निर्मीती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग असलेल्या महाराष्ट्र कमिटीत भाजपाचे राजेश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्राकडून बी. पी. एल व ए. पी. एल नागरीकांना होणारा अन्नपुरवठा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एस. एम. पाी. चा जास्तीत जास्त लाभ शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलतांना चौधरी यानी सांगितले.
यावेळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंधारणमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचे राजेश चौधरी यांनी आभार मानले. चौधरी यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.